शिळ्या भाकरीचा काला : पारंपरिक आणि चवदार महाराष्ट्रीयन रेसिपी

शिळ्या भाकरीचा काला ही पारंपरिक मराठी रेसिपी आहे, शिळ्या भाकरीपासून बनवा स्वादिष्ट आणि पौष्टिक काला ही सोपी रेसिपी, कमी वेळेत बनवा खास चवदार जेवण. शेतकरी संस्कृतीची खासियत! नमस्कार गृहिणींनो, आज आपण एकदम साधा पण चवदार पदार्थ तयार करायला शिकणार आहोत, आपण सगळ्यांना हा प्रश्न कधीतरी पडला असेल कि "या शिळ्या चपाती, भाकरीचे काय करायचे?" कारण प्रत्येक गृहिणी ही स्वयंपाक करताना थोडा जास्त स्वयंपाक करते का तर जेवताना कोणालाही कमी पडू नये, ही आपली भारतीय संस्कृती आहे. जेंव्हा चपाती किंवा भाकरी शिल्लक राहतात तेव्हा ह्या शिळ्या चपाती किंवा भाकरी घरच्या सदस्यांनी आवडीने खाव्यात याकरता या भाकरी चवदार लागयला हव्यात, अशा शिळ्या चपाती किंवा भाकरी आवडीने खाव्यात याकरिता आम्ही एक चविष्ट पदार्थ तयार करायला शिकूयात. शिळ्या भाकरीचा काला साहित्य:- ७-८ शिळ्य्या भाकरी, मूठभर शेंगदाणे, ६-७ हिरव्या मिरच्या, ७-८ कढीपत्ता पाने, १ चमचा साखर, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोव्हरी, १ बारीक चमचा हिंग, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा हळद, २ कांदे, १ टोमॅटो, २ चमचा तेल, कोथिं...