कोंडुळी मिक्स पीठाची : पोषणमय आणि चविष्ट रेसिपी
नमस्कार माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणी, आज आपण एक गावठी पण चविष्ट पदार्थ करायला शिकणार आहोत, त्या पदार्थांचे नाव पुढील प्रमाणे आहे. कोंडुळी मिक्स पीठ हे विविध प्रकारच्या धान्यांच्या मिश्रणाने तयार केलेले आरोग्यदायी पीठ आहे. यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, मूग, हरभरा यांसारखी पौष्टिक धान्ये असतात, ज्यामुळे हे पीठ प्रथिने, फायबर, आयर्न, आणि विविध जीवनसत्त्वांनी समृद्ध असते. हे पचायला सोपे असून रोजच्या आहारात पोळी, थालीपीठ, डोसा किंवा इतर पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते. विशेषतः पौष्टिक आणि संतुलित आहारासाठी हे पीठ उपयुक्त मानले जाते.
कोंडुळी मिक्स पीठाची
साहित्य
आर्धी वाटी ज्वारी पीठ, आर्धी वाटी बाजरी पीठ, आर्धी वाटी गव्हाचे पीठ, आर्धी वाटी बेसन पीठ, एक चमचा धणा पावडर, एक चमचा जिरे, एक चमचा ओवा, एक इंच आल्याचा तुकडा, लसूण पाकळ्या 12-15, एक चमचा मिरची पावडर, एक चमचा गरम मसाला पावडर, एक बारीक चमचा हिंग, कोथिंबीर, कढीपत्ता, मोठे तीन चमचा तेल, मीठ इत्यादी.
कृती
लसुण, आल्याचा तुकडा, जिरे आणि ओवा हे सर्व खलबत्यात बारीक ठेचून घ्यावे, नंतर एक परात (मोठी स्टीलची प्लेट) घ्यावी त्यात सर्व प्रकारची पीठे टाकवी. मिक्स पीठात एक चमचा मिरची पावडर, एक चमचा गरम मसाला पावडर, आर्धा चमचा हळद, एक चमचा धणेपूड, एक बारिक चमचा हिंग, चवीनुसार मीठ आणि लसूण, जिरे, ओवा,आलं याचे खलबत्यात ठेचलेले मिश्रण टाकावे.परातीतील सर्व मिश्रण मिक्स करून मळून घ्यावे.
गँस चालू करून त्यावर एक कढई ठेवावी.कढईत दोन चमचे तेल गरम करायला ठेवावे आणि तेल गरम झाले की थोडे जिरे, मोव्हरी, कडीपत्ता,थोडे हिंग टाकावा. हे सर्व कढले की त्यात चार ग्लास पाणी टाकावे. आदनाला उकळी येईपर्यंत मळलेल्या पीठातून किंचित पीठ घेऊन त्या पीठाची दोन्ही हाताने लाटून एक मध्यम जाड पण लांबलचक रेषा बनवावी, हि रेषा खूप लांब झाली असेल तर तीच्या मध्यभागी चिर द्यावा. मग ही अर्ध रेषा वर्तुळाकार करून एकमेकांना व्यवस्थित चिकटावी.
अशाच प्रकारे 8-10 लहान वर्तुळाकार करून प्लेटमध्ये ठेवावेत आणि आदनाला उकळी आली का ते पाहावे. उकळी आली की त्यात हे वर्तुळाकार अलगदपणे एक एक सोडावे, हाताला चटका बसणार नाही याची काळजी घ्यावी. गँस बारीक करून कढईवर प्लेट अर्धवट झाकावी, परत 8-10 वर्तुळाकार करून प्लेटमध्ये ठेवावे आणि प्लेट काढून कढईतील आदन चमच्याने एकदा खाली वर करावे,अशी कृती सर्व मळलेले पीठ संपेपर्यंत करावी. आदनात पाणी कमी असेल तर एक ग्लास पाणी टाका आणि मग शेवटचे वर्तुळाकार टाकावे.
आदन एकदा चमचाने खाली वर करून गँस मोठा करावा, आदन चार ते पाच मिनिटे उकळू द्यावे आणि गँस बंद करावा.त्यातील वर्तुळाकार एका प्लेटमध्ये काढावे आणि रस्सा कढईत ठेवावा. दुसऱ्या बाजूला एक छोटी कढई गँसवर ठेवून एक चमचा तेल, थोडे जिरे,मोव्हरी टाकावी.हे सर्व कढले की त्यात प्लेटमधील वर्तुळाकार टाकून पाच मिनिटे परतावे, दोन्ही कढईतील पदार्थावर थोडी कोथिंबीर शिंपडावी आणि गँस बंद करावा.
जेवणाच्या वेळी एक प्लेट घेऊन त्यात वर्तुळाकार वाढावेत व त्यावर गरम रस्सा घालावा, अशा प्रकारे प्लेट मध्ये जो पदार्थ तयार झाला आहे त्यास मिक्स पीठाची कोंडुळी म्हणतात. पदार्थ तयार करताना काही अडचण आली तरी कमेंट्स द्वारे आम्हाला विचारू शकतात. तुम्हाला जास्त तिखट आवडत असल्यास तिखटाचे प्रमाण वाढवू शकतात तरीही कोंडुळी छान लागतात.
Internal Link for More Information:
फूड रियलेटेड अधिक रेसिपी, टिप्स आणि मार्गदर्शकांसाठी, भेट द्या https://dainerohini87.blogspot.com/
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा