लपटपीत मेथी भाजी रेसिपी : झटपट आणि चविष्ट घरगुती पाककृती

लपतपीत मेथी भाजी ही महाराष्ट्रातील पारंपरिक आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. कमी मसाल्यात तयार होणारी ही भाजी मेथीच्या ताज्या पानांपासून बनवली जाते, ज्यामध्ये बेसन घालून एकसंध पोत मिळवली जाते. ही भाजी पौष्टिक असून पचनासाठी उपयुक्त आहे. भाकरी, चपाती किंवा गरम भातासोबत याचा आनंद घ्या!

नमस्कार, मैत्रीणी आज आपण लपतपीत मेथी भाजी तयार करू यात, मेथी भाजी ही भारतात प्रचलित असलेली व आरोग्यासाठी उपयुक्त अशी पालेभाजी आहे. यामध्ये लोह, कॅल्शियम, फायबर, आणि विविध जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात आढळतात. मेथी मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त असून, पचन सुधारण्यात मदत करते. ती विविध प्रकारे शिजवली जाते, जसे की पराठा, भाजी, भात, किंवा सूपमध्ये. तिच्या पानांव्यतिरिक्त बिया देखील औषधी गुणधर्मांसाठी वापरल्या जातात, ज्यामुळे ती अन्न आणि आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जाते.



साहित्य

1 मेथीची जुडी, 1वाटी शेंगदाणा कुट, 5-6 हिरव्या मिरच्या, 2 चमचा तेल, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोव्हरी, 1 बारीक चमचा हिंग, 1 ग्लास गरम पाणी, लसूण पाकळ्या 12-15, चवीनुसार मीठ इत्यादी.



कृती

प्रथम मेथी व्यवस्थित निसून घ्यावी नंतर सर्व मेथी बारीक चिरून घ्यावी,चिरलेली मेथी स्वच्छ धूवून घ्यावी,खलबत्यात लसूण ठेचून घ्यावा आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या. कढईत थोडे शेंगदाणे भाजून घ्यावे नंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्यावीत, कढई गँसवर ठेवून 2चमचा तेल घालावे, तेल तापले कि त्यात एक चमचा जिरे आणि एक मोव्हरी टाकावी, मोव्हरी तडली की त्यात टेचलेला लसूण आणि चिरलेली हिरवी मिरची टाकावी, एक चमचा हिंग घालावे.




मिश्रण चांगले फ्राय झाले की त्यात धुतलेली मेथी टाकावी, शेंगदाणे कुट आणि चवीनुसार मीठ टाकून मेथी चांगली मिक्स करावी. कढईवर प्लेट टेवून बारीक गँसवर शिजत ठेवावी आणि एका बाजूला एक ग्लास पाणी गरम व्हायला ठेवावे, भाजी शिजत आली की  त्यात गरम पाणी टाकावे आणि एक उकळी आली की गँस बंद करावा.


A pan filled with methi bhaji, showcasing vibrant green leaves and spices, ready to be served.


अशा प्रकारे आपली लपतपीत मेथी भाजी तयार झाली, ही भाजी भाकरी आणि पोळी बरोबर सर्व्ह करावी.आमची भाजी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला ई-मेल द्वारे कळवा. 

Internal Link for More Information:

फूड रियलेटेड अधिक रेसिपी, टिप्स आणि मार्गदर्शकांसाठी, भेट द्या https://dainerohini87.blogspot.com/







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिळ्या भाकरीचा काला : पारंपरिक आणि चवदार महाराष्ट्रीयन रेसिपी

चवळीची गावटी भाजी : पोषणमय आणि चविष्ट पारंपरिक रेसिपी

कोंडुळी मिक्स पीठाची : पोषणमय आणि चविष्ट रेसिपी

शेंगदाण्याचे बेसन : पौष्टिक आणि बहुपयोगी रेसिपी