साबुदाण्याची खिचडी : उपवासासाठी झटपट आणि चविष्ट रेसिपी

साबुदाण्याची खिचडी उपवासासाठी झटपट तयार होणारी, चविष्ट व पौष्टिक रेसिपी. भिजवलेला साबुदाणा, शेंगदाणा कूट, बटाटे आणि मसाले यांची योग्य सांगड. मराठी उपवासातील खास पदार्थ! साबुदाण्याची खिचडी हा महाराष्ट्रातील लोकप्रिय व उपवासासाठी खास बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ आहे. साबुदाणे भिजवून नंतर शिजवताना त्यात शेंगदाण्याचे कूट, उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, जिरे आणि साजूक तुपाचा वापर केला जातो. हा पदार्थ चवदार असून पोषणमूल्यांनी भरलेला आहे. साबुदाण्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्याने तो ऊर्जा प्रदान करतो, तर शेंगदाण्याच्या कुटामुळे प्रथिनांची भर पडते. वरून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून खिचडीला स्वादिष्ट रूप दिले जाते. साबुदाण्याची खिचडी उपवासाच्या वेळेस एक परिपूर्ण, हलका आणि तृप्त करणारा पर्याय मानला जातो. सर्व मैत्रिणीला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण साबुदाण्याची खिचडी करणार आहोत. ४ व्यक्ती,१५ मिनिटे साहित्य आर्धा किलो साबुदाणा, १ वाटी शेंगदाणे,२ मोठी बटाटे, ६-७ कढीपत्ता पाने, १ चमचा जिरे, थोडी कोथिंबीर, ९-१० हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ कृती प्रथम साबुदाणा पाण्याने ...