साबुदाण्याची खिचडी : उपवासासाठी झटपट आणि चविष्ट रेसिपी
साहित्य
आर्धा किलो साबुदाणा, १ वाटी शेंगदाणे,२ मोठी बटाटे, ६-७ कढीपत्ता पाने, १ चमचा जिरे, थोडी कोथिंबीर, ९-१० हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ
कृती
प्रथम साबुदाणा पाण्याने धुऊन साबुदाणाच्या वरती आर्धा इंच येईल येवढे पाणी टाकावे आणि ६-७ तास झाकून भिजत ठेवावे. तोपर्यंत हिरव्या मिरच्या चिरून घ्या. शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये मध्यम बारीक करून घ्या नंतर बटाटे साल काढून पातळ चिरून धुवून घ्या आणि कोंथिबीर धुवून चिरून घ्या. भिजलेल्या साबुदाण्यात शेंगदाणे कुट आणि चवीनुसार मीठ घालावे. गँसवर कढई ठेवावी नंतर त्यात २चमचा तेल घालावे, तेल गरम झाले की १ चमचा जिरे आणि कढीपत्ता पाने टाकावे हे सर्व कढले की त्यात हिरव्या मिरच्या आणि बटाटाच्या फोडी धुवून टाकाव्यात.
फोडी फ्राय झाल्या की त्यात साबुदाणा टाकावा. सर्व साबुदाणा व्यवस्थित परतून घ्यावा. बारीक गँस करून साबुदाणा कढईवर प्लेट झाकून शिजत ठेवा, थोड्या वेळाने साबुदाणा शिजला का ते पहावे, साबुदाणा शिजला की त्यात चिरलेली कोथिंबीर शिंपडावी आणि खिचडी वाढावी.
टिप
खिचडी लवकर करायची असेल तर साबुदाणा १०-१५ मिनिटे पाण्यात भिजवावा आणि मग सर्व पाणी
काढून ३ तास भिजत ठेवावा म्हणजे साबुदाणा लवकर करु शकतो. अशा प्रकारे साबुदाणा खिचडी तयार झाली आहे.
काढून ३ तास भिजत ठेवावा म्हणजे साबुदाणा लवकर करु शकतो. अशा प्रकारे साबुदाणा खिचडी तयार झाली आहे.
साबुदाण्याची खिचडी ही महाराष्ट्रातील उपवासासाठी खास बनवली जाणारी, चवदार आणि पोटभरणारी डिश आहे. भिजवलेल्या साबुदाण्यात शेंगदाण्याचा कूट, साखर, मीठ, आणि हिरव्या मिरच्यांची फोडणी मिसळून ही खिचडी तयार केली जाते. शिजवताना त्यात जीरे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घातल्याने तिची चव अधिक खुलते. वरून कुरकुरीत शेंगदाणे आणि नारळाचा किस टाकून सजवली जाते. साबुदाणा हा ऊर्जा प्रदान करणारा घटक असून, उपवासात पचायला हलका आणि पोषणमूल्यांनी भरलेला असतो. ताक किंवा दह्यासोबत खाल्ल्यास ही खिचडी परिपूर्ण आणि रुचकर लागते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा