चवळीची गावटी भाजी : पोषणमय आणि चविष्ट पारंपरिक रेसिपी
चवळीची गावटी भाजी पारंपरिक मराठी स्वादाची खास रेसिपी. ताजी चवळीची पाने आणि खास मसाल्यांसह बनवा पौष्टिक व स्वादिष्ट भाजी. सोपी पद्धत आणि गावठी चवीचा अनुभव घ्या!
चवळी गावटी भाजी ही ग्रामीण भागातील एक लोकप्रिय व पौष्टिक भाजी आहे. हिला मराठीत "चवळी" किंवा "चवळ्याची भाजी" असे म्हणतात. ही भाजी चविष्ट असून प्रथिने, फायबर, लोह आणि विविध जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. चवळीची पाने आणि शेंगा दोन्ही भाजीसाठी वापरली जातात. हिचे सेवन शरीराला उष्मांक देते आणि पचनासाठी उपयुक्त असते. साधारणपणे भाजी, वरण, उसळ किंवा पराठ्यांमध्ये चवळीचा समावेश केला जातो. ग्रामीण भागात हिला विशेष महत्त्व असून ती सेंद्रिय व नैसर्गिकरित्या उगवली जाते, ज्यामुळे ती आरोग्यासाठी अतिशय लाभदायक मानली जाते.
चवळीची गावटी भाजी साहित्य
१ चमचा तेल, १ चमचा जिरे, १ चमचा मोव्हरी, बारीक आर्धा चमचा हिंग, १२-१५ लसूण पाकळ्या, १ टोमॅटो, २ कांदा, ४-५ हिरव्या मिरच्या, आर्धी वाटी शेंगदाणे कुट, मीठ इत्यादी
चवळीची गावटी भाजी कृती
एक चवळीची जुडी घ्यावी आणि जुडी व्यवस्थित निसून बारीक चिरून घ्यावी, चिरलेली चवळी स्वच्छ धुवून पाणी निथळण्यास ठेवून द्यावी. लसूण, कांदे, हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावे नंतर गँस चालू करून कढई गँसवर ठेवावी, कढईत तेल घालून जिरे आणि मोव्हरीची फोडणी द्यावी, नंतर फोडणीत लसूण टाकावा आणि लसूण लालसर झाला की त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, कांदा आणि टोमॅटो टाकावा.
नंतर सर्व मिश्रण चांगले फ्राय करावे. कढईत पाणी निथलेली भाजी घालावी आणि त्या भाजीत चवीनुसार मीठ आणि शेंगदाणे कुट टाकावे, गँस बारीक करून कढईतील भाजी चमचाच्या साहयाने व्यवस्थित हलवावी आणि कढईवर प्लेट झाकुन भाजी शिजू द्यावी. थोडा वेळाने भाजी शिजली का ते पाहावे. भाजी शिजली की गँस बंद करावा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा