शिळ्या भाकरीचा काला : पारंपरिक आणि चवदार महाराष्ट्रीयन रेसिपी
नमस्कार गृहिणींनो, आज आपण एकदम साधा पण चवदार पदार्थ तयार करायला शिकणार आहोत, आपण सगळ्यांना हा प्रश्न कधीतरी पडला असेल कि "या शिळ्या चपाती, भाकरीचे काय करायचे?" कारण प्रत्येक गृहिणी ही स्वयंपाक करताना थोडा जास्त स्वयंपाक करते का तर जेवताना कोणालाही कमी पडू नये, ही आपली भारतीय संस्कृती आहे. जेंव्हा चपाती किंवा भाकरी शिल्लक राहतात तेव्हा ह्या शिळ्या चपाती किंवा भाकरी घरच्या सदस्यांनी आवडीने खाव्यात याकरता या भाकरी चवदार लागयला हव्यात, अशा शिळ्या चपाती किंवा भाकरी आवडीने खाव्यात याकरिता आम्ही एक चविष्ट पदार्थ तयार करायला शिकूयात.
शिळ्या भाकरीचा काला
साहित्य:-
७-८ शिळ्य्या भाकरी, मूठभर शेंगदाणे, ६-७ हिरव्या मिरच्या, ७-८ कढीपत्ता पाने, १ चमचा साखर, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोव्हरी, १ बारीक चमचा हिंग, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा हळद, २ कांदे, १ टोमॅटो, २ चमचा तेल, कोथिंबीर आणि मीठ इत्यादी.कृती:-
प्रथम शिळ्या भाकरी मिक्सरमध्ये बारीक करून घ्याव्यात नंतर कढई गँसवर ठेवून त्यात २ चमचा तेल गरम करायला ठेवावे,तेल गरम झाले कि त्यात मूठभर शेंगदाणे टाकावे आणि शेंगदाणे अर्धवट तळले कि त्यात प्रत्येकी अर्धा चमचा जिरे आणि मोव्हरी, ७-८ कढीपत्ता पाने, ६-७ हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकाव्यात. कढईतील सर्व मिश्रण कढले कि त्यात २ कांदे बारीक चिरून टाकावेत, नंतर कांदा लालसर झाल्यावर त्यात १ टोमॅटो बारीक चिरून टाकावा. टोमॅटो मऊसर झाला की त्यात अर्धा चमचा जिरेपूड, धणेपूड आणि अर्धा चमचा हळद टाकावी, सर्व मिश्रण मिक्स करावे.बारीक करून घेतलेल्या भाकरीत चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर टाकावी मग ह्या बारीक केलेला भाकरीचा चुरा कढईतील तडक्यात टाकावा, सर्व मिश्रण उलथण्याने एकजीव करून घ्यावे, त्यात थोडे थंड पाणी शिंपडून कढईवर प्लेट झाकावी आणि गँस बारीक करून वाफेवर शिजू द्याव्यात. पाच मिनिटांत सर्व मिश्रण व्यवस्थित हलवावे आणि आयत्या वेळी कोथिंबीर बारीक चिरून काल्यावर शिंपडावी.
अशा प्रकारे शिळ्या भाकरीचा काला तयार झाला आहे, तुम्ही नक्की पदार्थ तयार करून पहा आणि करताना काही अडचण आली तर आम्हाला कमेंट्स द्वारे कळवा की तुम्हाला पदार्थ कसा वाटला?
Internal
Link for More Information:
फूड रियलेटेड
अधिक रेसिपी, टिप्स आणि मार्गदर्शकांसाठी, भेट द्या https://dainerohini87.blogspot.com/
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा