शेपूची गावटी भाजी : पारंपरिक चवीची आरोग्यदायी रेसिपी
शेपूची गावटी भाजी साहित्य
१ जुडी शेपू,७-८ हिरव्या मिरच्या, १२-१५ लसूण पाकळ्या, २ कांदे, १ टोमॅटो, आर्धी वाटी मूगडाळ, बारीक आर्धी वाटी शेंगदाणे कुट, १ चमचा तेल, आर्धा चमचा जिरे, आर्धा चमचा मोव्हरी, बारीक आर्धा चमचा हिंग आणि मीठ इत्यादी.शेपूची गावटी भाजीकृती
प्रथम मूगडाळ धुवून भिजत घालावी नंतर शेपू व्यवस्थित निसून बारीक चिरून घ्यावा.हिरव्या मिरच्या, लसूण, कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. चिरलेला शेपू चांगला धुवून घ्यावा आणि पाणी निथळत ठेवावे. गँसवर कढई ठेवून १चमचा तेल टाकावे नंतर तेल तापले की त्यात प्रत्येकी आर्धा चमचा जिरे आणि मोव्हरी टाकावे, हे कढले की त्यात बारीक चिरलेला लसूण टाकावा. नंतर लसूण लालसर झाला की त्यात बारिक चिरलेल्या मिरच्या, बारिक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकून परतावा हे सर्व मिश्रण फ्राय झाले की त्यात धुतलेला शेपू टाकावा,नंतर भिजवलेली मुगदाळ टाकावी.चवीनुसार मीठ आणि त्यात शेंगदाणा कुट टाकावे आणि कढईवर प्लेट झाकून ठेवावी. नंतर गँस बारीक करुन भाजी वाफेवर शिजू द्यावी. मधून मधून भाजी हलवावी आणि भाजी शिजली की गँस बंद करावा. अशा प्रकारे आपली शेपूची भाजी तयार केली आहे, भाजी कशी वाटली ते कमेंट द्वारे कळवावे.
Internal
Link for More Information:
फूड रियलेटेड
अधिक रेसिपी, टिप्स आणि मार्गदर्शकांसाठी, भेट द्या https://dainerohini87.blogspot.com/
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा