मिक्स पीठाच्या थालीपीठाची रेसिपी : पौष्टिक आणि झटपट नाश्ता

मिक्स पीठाच्या थालीपीठाची रेसिपी पौष्टिक, सोपी आणि झटपट बनवण्यासाठी योग्य. वेगवेगळ्या पीठांचं एकत्र मिश्रण आणि खास मसाले यामुळे थालिपीठाला मिळते अप्रतिम चव. पारंपरिक मराठी न्याहारीची खासियत!

नमस्कार, मैत्रिणीनो आज आपण चविष्ट थालिपीठ मिक्स पीठाची करायला शिकणार आहोत ते पुढीलप्रमाणे आहे.
मिक्स पीठाच्या थालीपीठाची रेसिपी तयार करण्यासाठी मिक्स पीठ हा एक उत्तम पर्याय आहे. हे पीठ ज्वारी, बाजरी, नाचणी, हरभरा, आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण असतं, ज्यामुळे थालीपीठ पोषणमूल्यांनी भरलेलं आणि स्वादिष्ट होतं. थालीपीठ तयार करताना या पिठात कांदा, कोथिंबीर, किसलेलं गाजर, ठेचा, तीळ, जिरे, हळद, तिखट, मीठ, आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मळावं. नंतर तेल लावलेल्या तव्यावर हाताने थालीपीठ थापून, झाकण ठेवून शिजवायचं. गरमागरम थालीपीठ लोणी किंवा ताकासोबत सर्व्ह केल्यावर त्याचा स्वाद अप्रतिम लागतो.

साहित्य

आर्धी वाटी ज्वारी पीठ, आर्धी वाटी बाजरी पीठ, आर्धी वाटी गव्हु, आर्धी वाटी बेसन पीठ, १ चमचा जिरेपूड, १ चमचा धणेपूड, आर्धा चमचा हळद, १०-१२ हिरव्या मिरच्या, ८-१० लसूण पाकळ्या, २ इंच आल्याचा तुकडा, कोंथिबीर, १ चमचा जिरे, १ चमचा ओवा, ३ कांदे, आर्धा  चमचा गरम मसाला,हिंग,मीठ इत्यादी.




कृती

प्रथम एक स्टिलची मोठी परात (प्लेट )  घ्यावी नंतर परातीत सर्व प्रकारचे पीठ टाकावेत.पीठात हिरवी मिरची, जिरे, ओवा, आलं आणि लसूण यांचे वाटण, गरम मसाला, आर्धा चमचा हळद,१ चमचा धणेपूड,१ चमचा जिरेपूड, आर्धा चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ टाकावे.




पीठात थोडे थोडे पाणी घालून ते सर्व पीठ व्यवस्थित मळून घ्यावे नंतर पीठ ५-१० मिनिटे झाकून ठेवावे. पोळपाट घेऊन त्यावर एक स्वच्छ कपडा ओला करून पसरून टाकावा आणि एका पातेल्यात पाणी घेऊन पाण्याचा हात कपड्यावर सर्वीकडे लावावा, नंतर पीठाचा छोटा गोळा घेऊन कपड्यावर पाण्याच्या हाताने थालिपीठ नीट थापून घ्यावा.थापलेल्या बाजूला सर्वीकडे तेल लावून मध्यभागी एक छिद्र पाडावे. कपड्यासहित थालिपीठ अलगद उचलावे, तेल लावलेली बाजू तव्यावर खालच्या बाजूला टाकावी आणि वरच्या बाजूला सर्वीकडे तेल लावावे. थोड्या वेळाने उलतण्याच्या साहाय्याने थालीपीठ उलटावे नंतर खालची बाजू चांगली भाजली की थालीपीठ तव्यावरून काढून घ्यावे,अशाच प्रकारे सगळी थालिपीठं करून घ्यावे.


A pan of thalipith cooking on a stove, showcasing a delicious, traditional Indian dish being prepared.


वैशिष्ट्ये

गरमागरम थालीपीठ दही किंवा टोमॅटो साँस बरोबर सर्व्ह करावे म्हणजे खूप छान लागते. अशीच थालिपीठं तुम्ही घरी करून पहा आणि कसे झाले ते आम्हाला कमेंट्स द्वारे कळवा. पदार्थ आवडल्यास तुमच्या मैत्रीणींना शेअर करू शकतात. पदार्थ करताना काही समस्या आली तर आम्हाला संपर्क साधा.

Internal Link for More Information:

फूड रियलेटेड अधिक रेसिपी, टिप्स आणि मार्गदर्शकांसाठीभेट द्या https://dainerohini87.blogspot.com/

चविष्ट थालिपीठं ही महाराष्ट्रातील पारंपरिक आणि पोषणमूल्यांनी भरलेली खासियत आहे. मिक्स पीठाने बनवलेली थालिपीठं ही गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, हरभरा डाळ, आणि तांदूळ अशा विविध धान्यांचे पिठं एकत्र करून तयार केली जातात. यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, जिरे, हळद, मीठ आणि थोडीशी हिंग घालून तयार केलेला पीठाचा गोळा थोड्या तुपावर भाजून खमंग थालिपीठ तयार होतं. ताक, लोणी किंवा चटणीसोबत खाल्ल्यास त्याची चव अधिक खुलते. चव, आरोग्य आणि सहजतेचा संगम म्हणजे चविष्ट मिक्स पीठाची थालिपीठं!



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिळ्या भाकरीचा काला : पारंपरिक आणि चवदार महाराष्ट्रीयन रेसिपी

चवळीची गावटी भाजी : पोषणमय आणि चविष्ट पारंपरिक रेसिपी

कोंडुळी मिक्स पीठाची : पोषणमय आणि चविष्ट रेसिपी

शेंगदाण्याचे बेसन : पौष्टिक आणि बहुपयोगी रेसिपी

लपटपीत मेथी भाजी रेसिपी : झटपट आणि चविष्ट घरगुती पाककृती