भोगीची गावटी भाकरी : पारंपरिक रेसिपी आणि खास चव
भोगीची गावटी भाकरी सणासुदीचा पारंपरिक मराठी स्वाद. ताज्या भाजी, भरपूर मसाले आणि ज्वारीच्या पीठापासून बनवा आरोग्यदायी व चविष्ट भाकरी. भोगी सणाच्या खास जेवणासाठी योग्य निवड!
भोगी भाकरी हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात भोगी पंधरवड्यात किंवा संक्रांतीच्या पूर्वसंध्येला बनवला जाणारा पारंपरिक व स्वादिष्ट पदार्थ आहे. भोगी भाकरी ही विविध प्रकारच्या गावठी पालेभाज्या, जसे की चवळी, माठ, शेपू, पालक इत्यादींचा उपयोग करून तयार केली जाते. या भाज्यांमध्ये मका किंवा ज्वारीच्या पिठाचा समावेश करून भाकरीला चवदार बनवले जाते. हिचा स्वाद साध्या लोणच्याबरोबर, लसणाच्या चटणीबरोबर किंवा गुळाबरोबर अधिक खुलतो. भोगी भाकरी केवळ एक चविष्ट पदार्थ नसून, ती पोषणमूल्यांनी समृद्ध असते आणि सणाच्या वातावरणात एक खास पारंपरिक स्वाद प्रदान करते.
वेळ:- २ भाकरी १० मिनिटे,
साहित्य
१ वाटी बाजरी पीठ, मीठ, तीळ आणि पाणी इत्यादी.कृती
एक मोठी परात(स्टिल प्लेट) घ्यावी आणि त्यात एक वाटी बाजरीचे पीठ आणि चवीनुसार मीठ घ्यावे. एका वाडग्यात थंड पाणी घ्यावे नंतर पीठात थोडे थोडे पाणी टाकत पीठ व्यवस्थित मळून घ्यावे. पीठ चांगले मळले की एक भाकरी होईल एवढे पीठ घेऊन बाकीचे मळलेले पीठ बाजूला ठेवावे. परातीतील पीठाचा गोळा हातावर वर्तुळाकार करून घ्यावा. परातीत थोडे सुखे पीठ पसरुन टाकून त्यावर वर्तुळाकार ठेवावा. सुके पीठ हाताला लावून सुरवातीस एका हाताने भाकरी थोडी थापावी.
थोडे तीळ प्लेटमध्ये घ्यावे आणि थोडी थापून झाली की भाकरीवर सर्व बाजूने तीळ शिंपडून नंतर दोन्ही हातानी भाकरी सर्व बाजूला एक सारखी थापून घ्यावी. भाकरी थापून झाली की भाकरी अलगदपणे उचलून तव्यावर अशी टाका की सुके पीठ लागलेला भाग तव्यावर वरच्या बाजूला येईल आणि लगेच तव्यावरील भाकरीच्या वरच्या बाजूला सर्वीकडे पाण्याचा हात फिरवावा, मग लगेच तीळ भाकरीवर सर्वीकडे हाताने टाकावे.
पाणी सुकण्या अगोदर भाकर पटकन उलथावी. खालची बाजू सर्व बाजूने व्यवस्थित भाजली की भाकरी दुसऱ्या बाजूला उलटावी. भाकरी हळूहळू सर्व बाजूला फुगून वर येईल. भाकरी सर्व फुगली की ती काढून घ्यावी. अशीच कृती दुसरी भाकरी करताना करावी. अशाप्रकारे आपल्या बाजरीच्या भाकरी तयार झाल्या. तुम्ही नक्की करून पहा आणि काही अडचण आली तर आम्हाला कमेंट्स द्वारे कळवा.
Internal
Link for More Information:
फूड रियलेटेड
अधिक रेसिपी, टिप्स आणि मार्गदर्शकांसाठी, भेट द्या https://dainerohini87.blogspot.com/
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा