दाळ मिरचु : पारंपरिक आणि चविष्ट मसालेदार रेसिपी
कृती
प्रथम मुगदाळ धुवून भिजत ठेेेवावी. हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं हे मिक्सर मधून बारीक करून घ्यावे आणि गँसवर कढई ठेवावी, कढईत तेल घालून जिरे, मोव्हरी आणि कढीपत्ताची फोडणी द्यावी. ह्या फोडणीत मिक्सरमधील वाटण टाकून थोडे परतावे. नंतर त्यात दोन ग्लास गरम पाणी घालावे.त्यात मुगदाळ धुवून टाकावी. मग शेंगदाणे कुट आणि चवीनुसार मीठ घालावे, बारीक गँस करून कढईवर प्लेट झाकून शिजत ठेवावे. मधून मधून भाजी हलवून घ्या आणि मुगदाळ शिजली की गँस बंद करावा. अशा प्रकारे दाळ मिरचु तयार झाले आहे हे तुम्ही भाकरी, पोळी किंवा भात यापैकी कशा बरोबर ही खाऊ शकतात.
Internal
Link for More Information:
फूड रियलेटेड
अधिक रेसिपी, टिप्स आणि मार्गदर्शकांसाठी, भेट द्या https://dainerohini87.blogspot.com/
टिप
दाळ मिरचु हा महाराष्ट्रातील पारंपरिक आणि खमंग प्रकार आहे, जो विशेषतः ग्रामीण भागात लोकप्रिय आहे. डाळ मिरचु तयार करण्यासाठी हरभऱ्याची डाळ वापरली जाते. डाळ व्यवस्थित भिजवून घेतल्यानंतर ती वाटून घेतात आणि त्यात हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, मीठ, हळद आणि ओलं खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूट मिसळतात. ही तयार मिश्रित डाळ वाफवून घेतात किंवा गार करून तुपात फोडणी दिली जाते. काही ठिकाणी यात कांदा, कोथिंबीर घालून चव आणखी वाढवतात. गरम गरम भाकरी किंवा वरणभातासोबत खाल्ल्यास दाळ मिरचु अत्यंत स्वादिष्ट लागते. प्रथिनांनी समृद्ध आणि साधेपणाने भरलेला हा पदार्थ ग्रामीण स्वयंपाकातील खासियत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा