हरभरा पालेभाजी : स्वादिष्ट आणि पौष्टिक मराठी रेसिपी

हरभरा पालेभाजी चविष्ट, पोषणमूल्याने भरपूर आणि आरोग्यासाठी उपयुक्त भाजी. हरभरा पालेभाजीच्या पाककृती, फायदे आणि उपयोग जाणून घ्या. आपल्या आहारात नक्की सामील करा!

हरभरा पालेभाजी ही एक पोषणमूल्यांनी समृद्ध अशी पारंपरिक भाजी आहे, जी प्रामुख्याने हरभऱ्याच्या पानांपासून तयार केली जाते. हरभऱ्याच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम, प्रथिने, तसेच जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात, ज्यामुळे ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. ग्रामीण भागात विशेषतः उपवासाच्या आणि पोषक आहाराच्या काळात हरभरा पालेभाजीला मोठे महत्त्व दिले जाते. ही भाजी तयार करणे सोपे असून, चविष्ट आणि पोषणयुक्त असल्यामुळे ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी प्रिय असते. हरभरा पालेभाजी ही पारंपरिक भारतीय आहाराचा अविभाज्य भाग मानली जाते.


A collection of fresh ingredients for kadhi, including spices and herbs, arranged neatly on a wooden surface.


साहित्य

४ जण, १५ मिनिटे,

१ वाटी हरभऱ्याची कोवळी पाने चांगली उन्हात वाळवून कडक झालेली, आर्धी वाटी बेसन पीठ, ८-९ हिरव्या मिरच्या, १४-१५ लसूण पाकळ्या, ३-४ चमचा मोठाड शेंगदाणे कुट, २ चमचा तेल,१ चमचा जिरे, १ चमचा मोव्हरी, १ छोटा चमचा हिंग, मीठ इत्यादी.



कृती 


प्रथम हरभऱ्याची वाळवून कडक झालेली पाने घ्यावी त्यात बेसन पीठ घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करावे. गँसवर कढई ठेवावी त्यात तेल टाकावे आणि तेल गरम झाले की तेलात जिरे,मोव्हरी घालावी हे कढले की त्यात चिरलेला लसूण, चिरलेल्या मिरच्या आणि हिंग घालावे.

कढईतील सर्व कढले की त्यात २ ग्लास साधे पाणी घालावे नंतर त्यात शेंगदाणे कुट आणि चवीनुसार मीठ घालून आदणाला उकळी यायला ठेवावे. आदणाला उकळी आली की एक पळी घ्यावी आणि एका हाताने मिक्स केलेले मिश्रण थोडे थोडे करून टाकत जावे आणि पळीने कढईत टाकलेले मिश्रण हाटावे अशीच कृती सर्व मिश्रण संपेपर्यंत करावे. गँस बारीक करून भाजी शिजू द्यावी आणि मधून मधून भाजी हलवत जावी म्हणजे भाजी कढईला चिकटनार नाही, दहा मिनिटे भाजी शिजून तयार होते.अशा प्रकारे हरभऱ्याची पालेभाजी हाटून तयार झाली आहे ही भाजी तुम्ही भाकरी, पोळी आणि भात यापैकी कशावर देखील खाऊ शकतात.


An assortment of kadhi ingredients, featuring vibrant spices and fresh herbs, displayed on a rustic kitchen table.


टिप

हरभऱ्याची कोवळी भाजी कडक उन्हात वाळवून हवा बंद डब्यात भरून ठेवावी म्हणजे वर्षाच्या बाराही महिने ही भाजी करून खाऊ शकतात पण ही भाजी हाटताना भाजी पटापट हाटावी नाही तर भाजीत गोळे होण्याची शक्यता असते म्हणून भाजी हटताना थोडीशी काळजी घ्यावी. हरभरा पालेभाजी ही पोषणमूल्यांनी समृद्ध अशी एक आरोग्यदायी भाजी आहे. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर यांचा समावेश असून ती शरीराला ऊर्जा, पचनासाठी मदत आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. नियमित आहारात हरभऱ्याच्या पालेभाजीचा समावेश केल्यास आरोग्य टिकविण्यासोबतच हृदय, त्वचा आणि हाडांचे आरोग्यही सुधारते. तिचा सुगंध आणि चव यामुळे ती कोणत्याही जेवणात स्वादिष्ट घटक म्हणून उत्तम ठरते. अशा प्रकारे, हरभरा पालेभाजी ही पोषण आणि चव यांचा समतोल साधणारी आणि आरोग्यासाठी महत्त्वाची भाजी आहे.

Internal Link for More Information:

फूड रियलेटेड अधिक रेसिपी, टिप्स आणि मार्गदर्शकांसाठीभेट द्या https://dainerohini87.blogspot.com/



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिळ्या भाकरीचा काला : पारंपरिक आणि चवदार महाराष्ट्रीयन रेसिपी

चवळीची गावटी भाजी : पोषणमय आणि चविष्ट पारंपरिक रेसिपी

कोंडुळी मिक्स पीठाची : पोषणमय आणि चविष्ट रेसिपी

शेंगदाण्याचे बेसन : पौष्टिक आणि बहुपयोगी रेसिपी

लपटपीत मेथी भाजी रेसिपी : झटपट आणि चविष्ट घरगुती पाककृती