गाजर तिखट वडे हा चविष्ट आणि पौष्टिक महाराष्ट्रीयन नाश्ता आहे, ज्यामध्ये गाजर, बेसन आणि मसाले वापरले जातात. हा वाफवलेला आणि तळलेला पदार्थ चहा सोबत किंवा मुलांच्या डब्यात दिल्यास उत्तम पर्याय ठरतो.
गाजर तिखट वडे हा एक चविष्ट, कुरकुरीत आणि पोषणमूल्यांनी भरलेला मराठी पदार्थ आहे, जो विशेषतः गाजराचा उपयोग करून तयार केला जातो. वडे तयार करण्यासाठी गाजर किसून त्यात चणा पीठ, तांदळाचे पीठ, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, जिरे, धने पूड, आणि मीठ यांचे मिश्रण तयार केले जाते. आवश्यकतेनुसार पाणी घालून वड्यांचे पीठ सैलसर केले जाते. नंतर या मिश्रणाचे छोटे वडे तयार करून ते तेलात तळून घेतले जातात.
४ जण, ३० मिनिटं,
साहित्य
२ वाटी गव्हाचे पीठ, २ वाटी गाजर किस, १ चमचा हळद, १ चमचा मिरची पावडर, १ चमचा गरम मसाला पावडर, आर्धा चमचा धना पावडर,आर्धा चमचा जिरेपूड, १ चमचा गरम तेल आणि मीठ इत्यादी.
कृती
प्रथम प्लेटमध्ये गाजर किस घ्यावा नंतर त्यात गव्हाचे पीठ घालावे आणि मग त्यात मिरची पावडर, गरम मसाला, धना पावडर, जिरेपूड, मीठ टाकावे आणि सर्व मिक्स करून पीठ व्यवस्थित मळून घ्यावे. गँसवर कढई ठेवावी आणि मळलेल्या पीठातून छोटासा गोळा घ्यावा, पोळपाटावर प्लास्टिक पिशवी ठेवावी त्यावर तेलाचा हात लावून हा गोळा त्यावर ठेवून तेलाच्या हाताने थापावा आणि मध्यभागी एक छिद्र पाडावे.
कढईतील तेल गरम झाले की त्यात एक वर्तुळाकार टाकून फ्राय करून घ्यावा अशा प्रकारे एक एक करून सर्व वडे फ्राय करून घ्यावे, सर्व वडे फ्राय झाले की, गरम गरम वडे दही किंवा साँस बरोबर सर्व्ह करावे. आपणास हे
वडे आवडल्यास आम्हाला कमेंट्स द्वारे कळवावे.
टिप
गाजराचे वडे तयार करायला कमी वेळ लागतो, गाजर तिखट वडे हे कुरकुरीत, तिखटसर चव देणारे असून चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर अप्रतिम लागतात. गाजरामुळे वड्यांना गोडसर चव आणि पोषणमूल्य मिळते, तर चणा पीठामुळे ते खुसखुशीत होतात. गाजर तिखट वडे हे नाश्त्यासाठी, सणासुदीला किंवा हिवाळ्यात विशेष करून खाल्ले जातात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा