शेंगदाणे ठेचा : एक झटपट आणि स्वादिष्ट मराठी पदार्थ

शेंगदाणे ठेचा एक स्वादिष्ट आणि पौष्टिक मराठी पदार्थ आहे. घरच्या घरी साध्या सामग्रीतून बनवता येणारी ही रेसिपी सहज शिकून घ्या.

शेंगदाणे ठेचा हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक, चवदार आणि सोपा पदार्थ आहे, जो विशेषतः भाकरी, वरण-भात किंवा पिठल्यासोबत खाल्ला जातो. शेंगदाणे ठेचा तयार करण्यासाठी भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसूण आणि मीठ यांचे मिश्रण खलबत्त्यात कुटून तयार केले जाते. याला ठेचताना तुपाची हिंगासोबत फोडणी दिल्यास त्याला अधिक चव येते. ठेचा हा तिखटसर आणि कुरकुरीत लागतो, त्यामुळे तो जेवणात वेगळी चव आणतो. शेंगदाणे प्रथिनांचा समृद्ध स्रोत असून ते ऊर्जा प्रदान करतात, तर हिरव्या मिरच्या आणि लसूण यामुळे स्वाद आणि आरोग्यदायी फायदे मिळतात. शेंगदाणे ठेचा हा झटपट तयार होणारा पदार्थ असून ग्रामीण आणि शहरी भागात दोन्हीकडे लोकप्रिय आहे.


. A bowl of peanut chutney on a table accompanied by a knife, showcasing a traditional Indian dish.


१ वाटी, १५ मिनिटे,

साहित्य 

जास्त तिखटाच्या हिरव्या मिरची आर्धी वाटी, शेंगदाणे १ वाटी, ४-५ लसूण पाकळ्या, ३ चमचा तेल आणि मीठ इत्यादी.

कृती

प्रथम हिरव्या मिरच्या थोडे बारीक करून घ्या नंंतर त्यात शेंगदाणे, लसुण आणि चवीनुसार मीठ घालावे आणि परत सर्व मिक्सरमध्ये मोठाड बारीक करून घ्यावे. एक तवा गँसवर ठेवावा नंतर त्यात तेल घालावे. तेल गरम झाले की त्यात मिक्सरच्या भांड्यातील वाटण टाकावे. सर्व वाटण व्यवस्थित परतून घ्यावे. कडक होईपर्यंत गँसवर ठेवावे आणि मधूनमधून हलवत राहावे, हे वाटण कुरकुरीत झाले की गँस बंद करा आणि तवा थंड झाल्यावर तव्यावरील ठेचा एका बाउलमध्ये काढून घ्यावा.


A bowl of peanut chutney placed on a table with a knife, highlighting a popular Indian culinary delight.


अशा प्रकारे आपले शेंगदाणे ठेचा तयार झाला आहे, नक्की करून पहा आणि कसा वाटला ठेचा हे आम्हाला कमेंट्स द्वारे कळवा.

Internal Link for More Information:

फूड रियलेटेड अधिक रेसिपी, टिप्स आणि मार्गदर्शकांसाठीभेट द्या https://dainerohini87.blogspot.com/


टिप 

शेंगदाणे ठेचा करताना गँस बारीक करावा आणि पाण्याचा वापर करु नये नाही म्हणजे ठेचा कडक होणार नाही,शेंगदाणे जास्त बारीक करून नये. शेंगदाणे ठेचा बनवणे खूप सोपे आणि जलद आहे. साध्या आणि पौष्टिक घटकांसह हा पारंपारिक पदार्थ आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट करा आणि चवीला एक अनोखी वळण द्या.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिळ्या भाकरीचा काला : पारंपरिक आणि चवदार महाराष्ट्रीयन रेसिपी

चवळीची गावटी भाजी : पोषणमय आणि चविष्ट पारंपरिक रेसिपी

कोंडुळी मिक्स पीठाची : पोषणमय आणि चविष्ट रेसिपी

शेंगदाण्याचे बेसन : पौष्टिक आणि बहुपयोगी रेसिपी

लपटपीत मेथी भाजी रेसिपी : झटपट आणि चविष्ट घरगुती पाककृती