भोगी भाजी गावटी : एक पारंपारिक मराठी पदार्थाची खासियत
साहित्य
१ कांदा, १ टोमॅॅटो , १ चमचा जिरे, १ चमचा मोव्हरी, आर्धा चमचा हळद, बारीक आर्धा चमचा हिंग, १ चमचा मिरची पावडर, १ चमचा गरम मसाला, आर्धा चमचा जिरेपूड, आर्धा चमचा धणेपूड, सर्व प्रकारच्या भाज्या, मीठ इत्यादी.
कुट
शेंगदाणे आणि तीळ वेगवेगळी भाजून घ्यावी आणि हे दोन्ही थंड झाल्यावर बारीक करून घ्यावी.
वाटण
१ कांदा उभा चिरावा, १ खोबरं तुकडा बारीक चिरून, ६-७ लसूण पाकळ्या, आर्धा इंच आलं तुकडा बारीक चिरावा, हे सर्व मिश्रण वेगवेगळे थोडे तेल घालून फ्राय करून घ्यावे आणि हे मिश्रण थंड झाले की मिक्सरमध्ये टाकावे आणि थोडे पाणी घालून मिश्रण बारीक करून घ्यावे.
प्रथम सर्व भाज्या चिरून घ्याव्यात नंतर कढई गँसवर ठेवून त्यात १चमचा तेल टाकवे, तेल कढले की त्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून टाकावा, हे सर्व चांगले फ्राय झाले की आलं आणि लसूण ठेचून, ५-६ कढीपत्ता पाने घालावे आणि सर्व फ्राय झाले की त्यात वाटण टाकून परतावे आणि कढईवर प्लेट झाकून पाच मिनिटे बारीक गँसवर ठेवावे.
सारणाला तेल सुटले की त्यात सर्व चिरलेल्या भाज्या स्वच्छ धुवून टाकाव्यात. भाजीत मिरची पावडर, गरम मसाला, हळद, जिरेपूड, धणेपूड, कूट आणि चवीनुसार मीठ घालून सर्व भाजी नीट हलवून घ्यावे, आणि त्यात दोन ग्लास गरम पाणी टाकावे नंतर कढईवर प्लेट आर्धी झाकावी आणि भाजी बारीक गँसवर शिजू द्यावे. थोड्या वेळाने भाजी हलवावी आणि भाजी शिजली का ते पहावे, भाजी शिजली की गँस बंद करावा.
Internal
Link for More Information:
फूड रियलेटेड
अधिक रेसिपी, टिप्स आणि मार्गदर्शकांसाठी, भेट द्या https://dainerohini87.blogspot.com/
टीप
ही भाजी बाजरीच्या तीळ लावलेल्या भाकरी बरोबर सर्व्ह करावे म्हणजे खूप छान लागते. भोगीच्या सणाला बनवली जाणारी गावटी भाजी ही मराठी संस्कृतीतील खास परंपरा आहे. विविध हंगामी भाज्यांचा वापर करून तयार होणारी ही भाजी आरोग्यासाठी पौष्टिक असून ती सणाच्या आनंदाला एक वेगळाच गोडवा आणते. हरभऱ्याचे पान, शेवगा, वांगी, भोपळा, गाजर, मुळे, मूग, ज्वारीचे कणीस इत्यादी भाज्या एकत्र करून ती बनवली जाते. या भाज्यांमध्ये हळद, तिखट, गूळ आणि तेल घालून शिजवल्यामुळे ती चविष्ट आणि सुगंधी बनते. ही भाजी केवळ चविष्टच नाही तर विविध पोषणमूल्यांनी भरलेली आहे, ज्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा आणि ताजेपणा मिळतो. भोगीच्या दिवशी ज्वारीच्या भाकरीसोबत खाल्लेली ही गावटी भाजी पारंपरिक सणाचा आनंद द्विगुणित करते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा