ज्वारी भाकरी रेसिपी : हेल्दी आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन स्वाद
चविष्ट ज्वारी भाकरी पारंपरिक मराठी जेवणाचा आत्मा. पौष्टिक, तुकतुकीत आणि गोडसर चवीची भाकरी सोप्या पद्धतीने घरी बनवा. हेल्दी आणि स्वादिष्ट मराठी पदार्थासाठी योग्य निवड!
कृती
एक मोठी परात(स्टिल प्लेट) घ्यावी आणि त्यात एक वाटी ज्वारीचे पीठ आणि चवीनुसार मीठ घ्यावे. एका वाडग्यात थंड पाणी घ्यावे नंतर पीठात थोडे थोडे पाणी टाकत पीठ व्यवस्थित मळून घ्यावे. पीठ चांगले मळले की एक भाकरी होईल एवढे पीठ घेऊन बाकीचे मळलेले पीठ बाजूला ठेवावे. परातीतील पीठाचा गोळा हातावर वर्तुळाकार करून घ्यावा. परातीत थोडे सुखे पीठ पसरुन टाकून त्यावर वर्तुळाकार ठेवावा. सुके पीठ हाताला लावून सुरवातीस एका हाताने भाकरी थोडी थापावी नंतर दोन्ही हातानी भाकरी सर्व बाजूला एक सारखी थापून घ्यावी.भाकरी थापून झाली की भाकरी अलगदपणे उचलून तव्यावर अशी टाका की सुके पीठ लागलेला भाग तव्यावर वरच्या बाजूला येईल आणि लगेच तव्यावरील भाकरीच्या वरच्या बाजूला सर्वीकडे पाण्याचा हात फिरवावा. पाणी सुकण्या अगोदर भाकर पटकन उलथावी. खालची बाजू सर्व बाजूने व्यवस्थित भाजली की भाकरी दुसऱ्या बाजूला उलटावी.भाकरी हळूहळू सर्व बाजूला फुगून वर येईल. भाकरी सर्व फुगली की ती काढून घ्यावी.
अशीच कृती दुसरी भाकरी करताना करावी. अशाप्रकारे आपल्या ज्वारीच्या भाकरी तयार झाल्या. तुम्ही नक्की करून पहा आणि काही अडचण आली तर आम्हाला कमेंट्स द्वारे कळवा.
Internal
Link for More Information:
फूड रियलेटेड
अधिक रेसिपी, टिप्स आणि मार्गदर्शकांसाठी, भेट द्या https://dainerohini87.blogspot.com/
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा