बारीक चवळीची रस्सा भाजी : चविष्ट आणि पौष्टिक घरगुती रेसिपी
बारीक चवळीची रस्सा भाजी साहित्य
आर्धी वाटी बारीक चवळी, १ कांदा, १ टोमॅटो, ६-७ कढीपत्ता पाने, ९-१० लसूण पाकळ्या, आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर, १ चमचा मिरची पावडर, १ गरम मसाला, आर्धा चमचा जिरेपूड, आर्धा चमचा धणेपूड, आर्धा चमचा हळद, बारीक चमचा हिंग आणि मीठ इत्यादी.
वाटण
१ कांदा चिरून भाजून घ्या. आर्धी वाटी सुखे खोबरं खिसुन भाजून घ्या, ५-६ लसूण पाकळ्या आणि
१ इंच आलं या बारीक वाटण करणे.
१ इंच आलं या बारीक वाटण करणे.
प्रथम बारीक चवळी स्वच्छ धुऊन ३-४ तास भिजत ठेवावी , चवळी भिजली की तीच्यात थोडे मीठ घालून कुकर मध्ये शिजवून घ्यावी. गँस चालू करून त्यावर कढई ठेवावी, कढईत तेल लावून ते गरम झाले की तेलात मोव्हरी आणि जिरे घालावेत, हे कढले की त्यात कांदा आणि टोमॅटो टाकावा, कांदा लालसर झाला की त्यात आलं लसूण पेस्ट आणि थोडे हिंग घालावे, हे सर्व फ्राय झाले की त्यात लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर, हळद, जिरेपूड, धणेपूड घालून व्यवस्थित परतावे आणि मग त्यात वाटण टाकून परत परतून घ्यावे..
कढईवर प्लेट झाकून ठेवावी. वाटणाला तरी सुटली की त्यात शिजलेली बारीक चवळी घालावी आणि ज्या पाण्यात चवळी शिजवली ते पाणी गरजेनुसार टाकावे आणि चवीनुसार मीठ व चिरलेली कोथिंबीर घालावी. भाजीला उकळी आली की गँस बंद करावा, अशा प्रकारे आपली बारीक चवळीची रस्सा भाजी तयार करण्यात आली आहे, ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास आपणास कमेंट्स द्वारे कळवावे आणि ही भाजी करतांना काही समस्या आल्यास त्या समस्याचे निराकरण केले जाईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा