पावटा रस्सा भाजी : भिजवून सोललेली पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपी
साहित्य
२ कांदे, १ वाटी पावटा भिजवून सोललेला, १ टोमॅटो, ६-७ कढीपत्ता पाने, कोंथिबीर, ८-९ लसूण पाकळ्या, १ चमचा लाल मिरची पावडर, आर्धा चमचा गरम मसाला, १ चमचा जिरे, १ चमचा मोव्हरी, आर्धा चमचा हळद, हिंग आणि मीठ इत्यादी.
१ कांदा उभा चिरून थोडे तेल घालून फ्राय करावा, आर्धी वाटी सुखे खोबरं खिसुन भाजून घ्यावे आणि एक लसुण सोलून आणि एक इंच आलं चिरून घ्या नंतर मिक्सरचे भांडे घेऊन त्यात सर्व गोष्टी एकत्र टाकाव्यात आणि थोडे पाणी घालून सर्व व्यवस्थित बारीक करून घ्यावे.
कृती
प्रथम पावटा ४-५ तास भिजवून सोलून थोडे पाणी टाकून शिजत ठेवावा, पावटा अर्धवट शिजवून घ्यावा. गँसवर कढई ठेवून त्यात १चमचा तेल घालावे आणि तेल गरम झाले की त्यात मोव्हरी व जिरे टाकावे, हे तडतडले की त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकून परतावा, हे सर्व फ्राय झाले की त्यात वाटण, थोडे हिंग, मिरची पावडर, गरम मसाला आणि हळद घालून परतून घ्यावे आणि तेल सुटण्यासाठी ठेवावे.
भिजलेली पावटा दाळ कढईत टाकावी आणि सर्व व्यवस्थित परतून घ्यावे आणि त्यात एक ग्लास कोमट पाणी, चवीनुसार मीठ टाकावे. गँस बारीक करून कढईवर प्लेट झाकावी आणि भाजी वाफेवर शिजू द्यावी, मधूनमधून भाजी हलवावी, भाजी शिजली की गँस बंद करावा. अशा प्रकारे आपला दाळ कांदा रस्सा भाजी तयार झाली आहे,
घरी नक्की करून पहा आणि कशी वाटली ती आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा.
Internal
Link for More Information:
फूड रियलेटेड
अधिक रेसिपी, टिप्स आणि मार्गदर्शकांसाठी, भेट द्या https://dainerohini87.blogspot.com/
टिप
ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती किंवा भात यापैकी कशा बरोबर ही खाऊ शकतात. पावटा रस्सा भाजी ही एक चविष्ट, पौष्टिक आणि सुलभ रेसिपी आहे जी आपल्या कुटुंबाला आवडेल. भिजवून सोललेले पावटे आणि मसाल्यांचा उत्तम संगम तुम्हाला प्रत्येक बाईटमध्ये चव देईल. सोपी आणि जलद पद्धतीने तयार होणारी ही भाजी आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करा आणि त्याचा स्वाद आनंददायक अनुभव घ्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा