शेपूची गावटी भाजी : पारंपरिक चवीची आरोग्यदायी रेसिपी

शेपूची गावटी भाजी पारंपरिक मराठी चवीची रेसिपी. ताजी शेपूची पाने, खास मसाले आणि सोपी पद्धत यामुळे मिळवा आरोग्यदायी आणि स्वादिष्ट गावठी भाजीचा आनंद. मराठी स्वयंपाकघरातील खास पदार्थ! आज आपण शेपूची गावटी भाजी करायला शिकणार आहोत ती पुढीलप्रमाणेआहे. शेपूची गावठी भाजी ही महाराष्ट्रातील पारंपरिक आणि पौष्टिक भाजी आहे, जी शेपूच्या कोवळ्या पानांपासून तयार केली जाते. ही भाजी पचायला हलकी असून आयर्न, कॅल्शियम, आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. भाजी तयार करण्यासाठी शेपूची पानं चिरून, त्यात मटकीचे मोड, लसूण, हिरव्या मिरच्या, हळद, तिखट, आणि थोडंसं बेसन घालून शिजवलं जातं. तिखटसर आणि घरगुती चवीसाठी ही भाजी उत्तम असते. गरम भाकरी, पोळी, किंवा भातासोबत ही भाजी खूप स्वादिष्ट लागते. शेपूची गावटी भाजी साहित्य १ जुडी शेपू ,७-८ हिरव्या मिरच्या, १२-१५ लसूण पाकळ्या, २ कांदे, १ टोमॅटो, आर्धी वाटी मूगडाळ, बारीक आर्धी वाटी शेंगदाणे कुट, १ चमचा तेल, आर्धा चमचा जिरे, आर्धा चमचा मोव्हरी, बारीक आर्धा चमचा हिंग आणि मीठ इत्यादी. शेपूची गावटी भाजीकृती प्रथम मूगडाळ धुवून भिजत घालावी नंतर शेपू व्यवस्थित निसून बारी...