पोस्ट्स

शेपूची गावटी भाजी : पारंपरिक चवीची आरोग्यदायी रेसिपी

इमेज
शेपूची गावटी भाजी पारंपरिक मराठी चवीची रेसिपी. ताजी शेपूची पाने, खास मसाले आणि सोपी पद्धत यामुळे मिळवा आरोग्यदायी आणि स्वादिष्ट गावठी भाजीचा आनंद. मराठी स्वयंपाकघरातील खास पदार्थ! आज आपण शेपूची गावटी भाजी करायला शिकणार आहोत ती पुढीलप्रमाणेआहे.  शेपूची गावठी भाजी ही महाराष्ट्रातील पारंपरिक आणि पौष्टिक भाजी आहे, जी शेपूच्या कोवळ्या पानांपासून तयार केली जाते. ही भाजी पचायला हलकी असून आयर्न, कॅल्शियम, आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. भाजी तयार करण्यासाठी शेपूची पानं चिरून, त्यात मटकीचे मोड, लसूण, हिरव्या मिरच्या, हळद, तिखट, आणि थोडंसं बेसन घालून शिजवलं जातं. तिखटसर आणि घरगुती चवीसाठी ही भाजी उत्तम असते. गरम भाकरी, पोळी, किंवा भातासोबत ही भाजी खूप स्वादिष्ट लागते. शेपूची गावटी भाजी साहित्य १ जुडी शेपू ,७-८ हिरव्या मिरच्या, १२-१५ लसूण पाकळ्या, २ कांदे, १ टोमॅटो, आर्धी वाटी मूगडाळ, बारीक आर्धी वाटी शेंगदाणे कुट, १ चमचा तेल, आर्धा चमचा जिरे, आर्धा चमचा मोव्हरी, बारीक आर्धा चमचा हिंग आणि मीठ इत्यादी. शेपूची गावटी भाजीकृती प्रथम मूगडाळ धुवून भिजत घालावी नंतर शेपू व्यवस्थित निसून बारी...

ज्वारी भाकरी रेसिपी : हेल्दी आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन स्वाद

इमेज
चविष्ट ज्वारी भाकरी पारंपरिक मराठी जेवणाचा आत्मा. पौष्टिक, तुकतुकीत आणि गोडसर चवीची भाकरी सोप्या पद्धतीने घरी बनवा. हेल्दी आणि स्वादिष्ट मराठी पदार्थासाठी योग्य निवड! चविष्ट ज्वारी भाकरी तयार करण्यासाठी तुम्हाला काही साधे घटक आणि योग्य पद्धत वापरायची असते. ज्वारीचं पीठ मळण्यासाठी गरम पाणी वापरल्यामुळे भाकरी मऊ होते. पीठ थोडंसा वेळ मुरवल्यानंतर, हाताने किंवा बेलनाने पातळसर भाकरी लाटून ती गरम तव्यावर भाजायची असते. तव्यावर भाकरी हलकी फुगून खमंग भाजली जाते, त्यामुळे तिचा स्वाद अजूनच वाढतो. भाकरीला घरगुती लोणी , ठेचा, भाजी, किंवा ताकासोबत सर्व्ह केल्यास ती अधिक स्वादिष्ट लागते. साहित्य वेळ:-  २ भाकरी १० मिनिटे, १ वाटी ज्वारीचे पीठ, मीठ आणि पाणी इत्यादी. कृती एक मोठी परात(स्टिल प्लेट) घ्यावी आणि त्यात एक वाटी ज्वारीचे पीठ आणि चवीनुसार मीठ घ्यावे. एका वाडग्यात थंड पाणी घ्यावे नंतर पीठात थोडे थोडे पाणी टाकत पीठ व्यवस्थित मळून घ्यावे. पीठ चांगले मळले की एक भाकरी होईल एवढे पीठ घेऊन बाकीचे मळलेले पीठ बाजूला ठेवावे. परातीतील पीठाचा गोळा हातावर वर्तुळाकार करून घ्यावा. परातीत थोडे सुखे प...

मिक्स पीठाच्या थालीपीठाची रेसिपी : पौष्टिक आणि झटपट नाश्ता

इमेज
मिक्स पीठाच्या थालीपीठाची रेसिपी  पौष्टिक, सोपी आणि झटपट बनवण्यासाठी योग्य. वेगवेगळ्या पीठांचं एकत्र मिश्रण आणि खास मसाले यामुळे थालिपीठाला मिळते अप्रतिम चव. पारंपरिक मराठी न्याहारीची खासियत! नमस्कार, मैत्रिणीनो आज आपण चविष्ट थालिपीठ मिक्स पीठाची करायला शिकणार आहोत ते पुढीलप्रमाणे आहे. मिक्स पीठाच्या थालीपीठाची रेसिपी तयार करण्यासाठी मिक्स पीठ हा एक उत्तम पर्याय आहे. हे पीठ ज्वारी, बाजरी, नाचणी, हरभरा, आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण असतं, ज्यामुळे थालीपीठ पोषणमूल्यांनी भरलेलं आणि स्वादिष्ट होतं. थालीपीठ तयार करताना या पिठात कांदा, कोथिंबीर, किसलेलं गाजर, ठेचा, तीळ, जिरे, हळद, तिखट, मीठ, आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मळावं. नंतर तेल लावलेल्या तव्यावर हाताने थालीपीठ थापून, झाकण ठेवून शिजवायचं. गरमागरम थालीपीठ लोणी किंवा ताकासोबत सर्व्ह केल्यावर त्याचा स्वाद अप्रतिम लागतो. साहित्य आर्धी वाटी ज्वारी पीठ, आर्धी वाटी बाजरी पीठ, आर्धी वाटी गव्हु, आर्धी वाटी बेसन पीठ, १ चमचा जिरेपूड, १ चमचा धणेपूड, आर्धा चमचा हळद, १०-१२ हिरव्या मिरच्या, ८-१० लसूण पाकळ्या, २ इंच आल्याचा तुकडा, कोंथिबीर, १ ...

शिळ्या भाकरीचा काला : पारंपरिक आणि चवदार महाराष्ट्रीयन रेसिपी

इमेज
शिळ्या भाकरीचा काला ही पारंपरिक मराठी रेसिपी आहे, शिळ्या भाकरीपासून बनवा स्वादिष्ट आणि पौष्टिक काला ही सोपी रेसिपी, कमी वेळेत बनवा खास चवदार जेवण. शेतकरी संस्कृतीची खासियत! नमस्कार गृहिणींनो, आज आपण एकदम साधा  पण चवदार पदार्थ तयार करायला शिकणार आहोत, आपण सगळ्यांना हा प्रश्न कधीतरी पडला असेल कि "या शिळ्या चपाती, भाकरीचे काय करायचे?" कारण प्रत्येक गृहिणी ही स्वयंपाक करताना थोडा जास्त स्वयंपाक करते का तर जेवताना कोणालाही कमी पडू नये, ही आपली भारतीय संस्कृती आहे. जेंव्हा चपाती किंवा भाकरी शिल्लक राहतात तेव्हा ह्या शिळ्या चपाती किंवा भाकरी घरच्या सदस्यांनी आवडीने खाव्यात याकरता या भाकरी चवदार लागयला हव्यात, अशा शिळ्या चपाती किंवा भाकरी आवडीने खाव्यात याकरिता आम्ही एक चविष्ट पदार्थ तयार करायला शिकूयात. शिळ्या भाकरीचा काला साहित्य:-  ७-८ शिळ्य्या भाकरी, मूठभर शेंगदाणे, ६-७ हिरव्या मिरच्या, ७-८ कढीपत्ता पाने, १ चमचा साखर, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोव्हरी, १ बारीक चमचा हिंग, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा हळद, २ कांदे, १ टोमॅटो, २ चमचा तेल, कोथिं...

कोंडुळी मिक्स पीठाची : पोषणमय आणि चविष्ट रेसिपी

इमेज
घरच्या घरी तयार करा हेल्दी आणि पौष्टिक कोंडुळी मिक्स पीठ . वजन कमी करणे, पचन सुधारणा, आणि शरीराला आवश्यक प्रोटीन व फायबर मिळवण्यासाठी सर्वोत्तम. आजच वाचा! नमस्कार माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणी, आज आपण एक गावठी पण चविष्ट पदार्थ करायला शिकणार आहोत, त्या पदार्थांचे नाव पुढील प्रमाणे आहे. कोंडुळी मिक्स पीठ हे विविध प्रकारच्या धान्यांच्या मिश्रणाने तयार केलेले आरोग्यदायी पीठ आहे. यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, मूग, हरभरा यांसारखी पौष्टिक धान्ये असतात, ज्यामुळे हे पीठ प्रथिने, फायबर, आयर्न, आणि विविध जीवनसत्त्वांनी समृद्ध असते. हे पचायला सोपे असून रोजच्या आहारात पोळी, थालीपीठ, डोसा किंवा इतर पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते. विशेषतः पौष्टिक आणि संतुलित आहारासाठी हे पीठ उपयुक्त मानले जाते. कोंडुळी मिक्स पीठाची साहित्य आर्धी वाटी ज्वारी पीठ, आर्धी वाटी बाजरी पीठ, आर्धी वाटी गव्हाचे पीठ, आर्धी वाटी बेसन पीठ, एक चमचा धणा पावडर, एक चमचा जिरे, एक चमचा ओवा, एक इंच आल्याचा तुकडा, लसूण पाकळ्या 12-15, एक चमचा मिरची पावडर, एक चमचा गरम मसाला पावडर, एक बारीक चमचा हिंग, कोथिंबीर, कढीपत्ता, म...